वाळूची तस्करी करणाऱ्या १३ टिप्परवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:27 AM2019-06-13T01:27:04+5:302019-06-13T01:27:48+5:30

मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे.

Action on 13 smugglers who have smuggled | वाळूची तस्करी करणाऱ्या १३ टिप्परवर कारवाई

वाळूची तस्करी करणाऱ्या १३ टिप्परवर कारवाई

Next
ठळक मुद्देब्रह्मपुरी तहसीलदारांची तक्रार : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई; तस्करांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामध्येही रेती तस्कर सक्रीय झाल्यामुळे तहसीलदारांनी चंद्रपूर येथील उपप्रादेशीय परिवहन अधिकाºयांना कारवाई करण्यासंदर्भात कळविले होते. याअंतर्गत तब्बल १३ वाहनांवर वायुवेग पथकाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर उपविभागीय अधिकाºयांनीही दोन वाहनांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे. एकूणच जिल्ह्यात रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली असून तस्करांचे धाबे दणाणले आहे.
यावर्षी अद्यापही रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यातच शहरासह ग्रामीण भागामध्ये खासगी तसेच शासकीय इमारत, रस्त्यांचे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे रेतीची मागणी वाढली आहे. मात्र रेती घाटांचा लिलावच झाला नसल्याने बांधकाम धारकांना रेती सहजासहजी मिळत नाही. परिणामी काही रेती तस्करांनी आपला डाव साधला असून छुप्या मार्गाने नदी, नाल्यांतील रेतीची तस्करी सुरु केली आहे. परिमाणी शासनाचा मोठ्या प्रमाणात महससूल बुडत आहे. त्यातच नदी-नाल्यांचे पात्रही धोक्यात आले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुराचा धोकाही आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये हिच स्थिती आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी येथील तहसीलदारांनी तालुक्यातील रेती तस्करी करणाºया वाहनांची तपासणी करण्यासंदर्भात चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना कळविले होते. त्यानुसार येथील पथकाने तपासणी केली असता रेतीची अवैध वाहतूक करताना तब्बल १३ टिप्पर आढळून आले. या वाहनांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये एमएच ४०-एन ३२३७, एमएच ४०-बीएल ४८१८, एमएच ४०-एके ८१७५, एमएच ४० बीजी ९३४४, एमएच ४०-एके ५६९१, एमएच ४० एके ९२६५, एमएच ४० वाय ७७९९, एमएच ४० एके ७३३८, एमएच ४९ एटी २३००, एमएच ४९ एटी ९१७५, एमएच ४९ एटी ५१५२, एमएच ४९ एटी ७४७४, एमएच ४९ एटी ७६७४ या वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे तर काही वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर पूर्व कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. सदर वाहन मोटर वाहन कायदा १९८८ नुसार ताब्यात घेण्यात आले आहे. या १३ वाहनांपैकी ११ वाहनधारकांनी न्यायालयात सुप्रतनाम्यावर वाहन सोडविण्यासाठी विनंती केली आहे. मात्र सुपतनाम्यावर वाहन सोडू नये, असे विनंतीपत्र आरटीओ कार्यालयाकडून न्यायालयात सादर करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळवून या वाहनांची नोंदणी रद्द करून परवाना एक वर्षांसाठी निलंबित करावा, असेही कळविण्यात आले आहे.

चंद्रपूर,पोंभूर्ण्यातही कारवाई
चंद्रपूर उपविभागीय अधिकाºयांकडून वाहन क्रमांक एमएच ४० एके २०७७ तसेच एमएच ३४ एम ४७०४ या दोन वाहनांवर सुधारित वाळू धोरणानुसार कारवाई करण्यासंबंधाने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर पोंभूर्णा तहसीलदारांनी दोन हायवा वाहनांवर कारवाई केल्याचे आरटीआेंना कळविले आहे.

Web Title: Action on 13 smugglers who have smuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.