३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:43 AM2018-12-24T00:43:09+5:302018-12-24T00:43:46+5:30

शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे.

Action on 300 Drivers | ३०० वाहनचालकांवर कारवाई

३०० वाहनचालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे९२ हजारांचा दंड वसूल : नव्या वाहतूक निरीक्षकाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे. मागील दोन दिवसांत त्यांनी ३२१ वाहनचालकांवर विविध नियमांनुसार कारवाई करीत ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
पर्यावरण विभागाचे सचिवाच्या आदेशानुसार तत्कालीन वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व महेश कोंडावार यांनी मोठ्या जोमात कारवाई सुरु केली होती. मात्र अल्पावधितच त्यांची मोहीम थंडावली. त्यातच त्यांची बदली झाल्याने जयवंत चव्हाण यांनी वाहतूक निरिक्षक पदाचा पदभार स्विकारुन पुन्हा कारवाई सुरु केली. शुक्रवारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातील पथकांनी विना हेल्मेट वाहन चालविणाºया ८६, ओव्हर लोड वाहतूक दोन, नो पार्किग १२, बिवा सीट बेल्ट १९, राग साईड नऊ, ट्रिपल सीट एक, सिंगल जंम्पींग एक, ओव्हर सिट तीन, फॅन्सी नंबर प्लेट दोन, विना वाहन परवाना ३६, विना कागदपत्राअभावी वाहन चालविणे ११ अशा विविध नियमानुसार १८८ वाहनधारकांन्वर कारवाई करण्यात आली. यावेळी ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर शनिवारी १३३ वाहनचालकांवर कारवाई करीत २८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

वाहनचालकांना समुपदेशन
शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लघन करतात. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक निरिक्षक चव्हाण यांनी वाहनधारकांच्या पालकांना बोलाऊन त्यांच्यासमक्ष वाहनधारकांना समुपदेशन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालण करीत वाहन चालविण्याचा संदेश दिला.

वाहनचालकांवर कारवाई करुन दंड आकारला तरीसुद्धा ते वाहतूक नियमांचे उल्लघन करताना मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्यांना वाहतूक नियमांचे उल्लघन केल्याने होणाºया दुष्परिणामाची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलासमोर समुदेशनातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालण करण्याचा सल्ला दिला..
- जयवंत चव्हाण,
वाहतूक निरिक्षक, चंद्रपूर.

Web Title: Action on 300 Drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.