तिनशे वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:41 PM2019-01-31T22:41:49+5:302019-01-31T22:42:06+5:30

विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी व गुरुवारी या मोहिमेतंर्गत वाहतूक शाखने २८७ वाहनचालकांवर कारवाई करुन ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाºया वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Action on 300 drivers | तिनशे वाहनचालकांवर कारवाई

तिनशे वाहनचालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे६४ हजारांचा दंड वसूल : वाहतूक शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी व गुरुवारी या मोहिमेतंर्गत वाहतूक शाखने २८७ वाहनचालकांवर कारवाई करुन ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाºया वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरात दिवसेंदिवस दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्या वाढली आहे. मात्र अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अनेक दुचाकी विना नंबरप्लेटच्या आहेत. तर काही वाहनांवर फॅन्सी नंबर लिहिलेला आहे. अनेक वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावला आहे. हे वाहनचालक अनावश्यक ठिकाणी हॉर्ण वाजवतात त्यामुळे इतर वाहनचालकांना अडचण होते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुन्डट फेडरेशनने केली होती. हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वाहतूक विभागाने कारवाई सुरु केली. बुधवारी वाहतूक विभागाने फॅन्सी नंबर प्लेट ५३, नो पार्किंग १५, विना सिटबेल्ट ४०, ओव्हर सिट चार, ट्रिपल सिट तीन, विना पीयुसी दोन, फ्रट सिट तीन, विनापरवाना चार, विना कागदपत्र ५०, परवाना न बाळगणे ५३, अवैध वाहतूक दोन, गाड्यांना भडक रंगाचा काच एक व इतर सहा अशा एकूण २४४ वाहनांवर कारवाई करुन ५६ हजार शंभर रुपये तर गुरुवारी ४३ विना नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करुन नऊ हजार असा एकूण ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कागदपत्राची तपासणी
अनेकांजवळ वाहनांचे कागदपत्र नाही. तर अनेक वाहनचालक कागदपत्र स्वत:जवळ बाळगत नाही. वाहतूक शाखेकडून कागदपत्राची तपासणी सुरु असून ज्याच्याजवळ कागदपत्रे नाही, अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Action on 300 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.