एका दिवसात ६० नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:50+5:302021-02-27T04:37:50+5:30
मूल : कोरोना संसर्ग वाढत असतानाही नागरिकांकडून पाहिजे त्याप्रमाणात कोरोना नियमाचे पालन केल्या जात नसल्याने मूल शहरातील ६० नागरिकांवर ...
मूल : कोरोना संसर्ग वाढत असतानाही नागरिकांकडून पाहिजे त्याप्रमाणात कोरोना नियमाचे पालन केल्या जात नसल्याने मूल शहरातील ६० नागरिकांवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आले आहे.
मूल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी तालुका प्रशासनान प्रयत्नशील आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, त्यासोबतच नागरीकांनी गर्दी करू नये व शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र नागरिकांनी गर्दीत असतानाही मास्कचा वापर करीत नव्हते, यामुळे नगर पालिकेने २५ फेब्रुवारी रोजी वेगवेगळे दहा पथक तयार केले. या पथकाच्या माध्यमातुन मूल शहरात फिरून ६० नागरिकांवर एकाच दिवशी कारवाई केली असून त्यांच्याकडून ३० हजार रूपये दंड वसुल केला आहे.
बॉक्स
दोन दिवसांपूर्वी ४९ नागरिकांवर मास्कची कारवाई करण्यात आली होती, दरम्यान २४ हजार ५०० रूपये दंड वसुल करण्यात आला होता. मूलचे तहसीलदार डाॅ. रविंद्र होळी, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे, विलास कागदेलवार, अशोक बाबर, सुजित जोगे, प्रतीक डोंगे यांनी कारवाई केली.