सात महिन्यात सतराशे ट्रिपल सिट वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:51+5:302021-09-07T04:33:51+5:30
वाहनचालकाने सुरक्षित वाहने चालवावे यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्या नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस ...
वाहनचालकाने सुरक्षित वाहने चालवावे यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्या नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस शहरातील मुख्य रस्त्यासह चौका-चौकात उभे राहून कारवाई करीत असतात. परंतु, काही वाहनचालक पर्यायी मार्गाने वळते करून पळवाट करतात. कधीकधी तर पोलिसांना बघून वेगाने वाहन पळवितात. या प्रकाराने अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस सक्त झाले असून, नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. मागील सात महिन्यात ट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्या १७१७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
बॉक्स
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळ
वाहन चालविताना वाहनाची कागदपत्रे नेहमी स्वत:जवळ बाळगावी
हेल्मेट लावूनच वाहन चालवावे,
ट्रिपल सिट वाहन चालवू नये.
नियमानुसारच वाहनावर नंबर टाकावा. फॅन्सी पद्धतीने नंबर टाकू नये.
दुचाकीचे हेड व टेललाइट सुरू होतात की नाही याकडे लक्ष द्यावे.
ठरवून दिलेल्या गतीपेक्षा जास्त गतीने वाहन चालवू नये.
बॉक्स
किती जणांवर झाली कारवाई
जानेवारी ३१८
फेब्रुवारी २९९
मार्च २५७
एप्रिल १६७
मे १३९
जून २८४
जुलै २५३
बॉक्स
तर पाचशेचा दंड
विनाहेल्मेट ५००
प्रेशर हॉर्न १०००
विनापरवाना ५००
स्टटबाजी २०००
रिफ्लेक्टर १०००
-----
कोट
गणपतीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे शहरात कोंडी होऊ नये, या अनुषंगाने पार्किंग स्थळे, नो पार्किंगची स्थळे याबाबतची फलक मनपाच्या सहकार्याने शहरात लावण्यात येणार आहेत. तसेच ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी नियमांचे पालन करीतच वाहने चालवून सहकार्य करावे.
- प्रवीणकुमार पाटील, वाहतूक निरीक्षक
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.