२ हजार वीज चोरांविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:04 PM2019-01-30T23:04:57+5:302019-01-30T23:05:20+5:30
महावितरण चंद्रपूर परिमंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीज चोरीविरूद्ध मोहीम राबवून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात १ हजार ९४७ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदर वीजचोरांनी ४ कोटी ५० लाखांची वीजचोरी केली. यातील ५९८ जणांनी तारांवर आकडे टाकून तर १ हजार ३४९ जणांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली. तब्बल ४३ लाख ८८ हजार ८१७ युनिटसची वीजचोरी झाल्याचे महावितरणने कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीज चोरीविरूद्ध मोहीम राबवून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात १ हजार ९४७ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदर वीजचोरांनी ४ कोटी ५० लाखांची वीजचोरी केली. यातील ५९८ जणांनी तारांवर आकडे टाकून तर १ हजार ३४९ जणांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली. तब्बल ४३ लाख ८८ हजार ८१७ युनिटसची वीजचोरी झाल्याचे महावितरणने कळविले आहे.
महावितरणचे स्थानिक विभाग, उपविभाग व शाखा अभियंता पथकाने दोनही मंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम सुरू केली. वीजचोरी रोखण्यासाठी तयार केलेल्या या भरारी पथकात मोठ्या कौशल्याने चोऱ्या उघडकीस आणल्या. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण जी. गुप्ता (७५ हजार) विजय ठाकरे, गडचांदूर ( ९०३ हजार), गिरीश भास्करे गडचांदूर (६० हजार), विठ्ठल राठोड, नानाजी टोंगे (४३ हजार) टायटस डेव्हिड, बल्लारपूर (१ लाख ५७ हजार) घनश्याम बाथव (६४ हजार), मानिक माकोडे (८३ हजार) रिना गुप्ता, भद्रावती (१ लाख ७७ हजार) विजय राठोड (५६ हजार) ममता छाजेड (२ लाख २४ हजार) कादंबिनी भगत चंद्रपूर (६० हजार), संदीप काळे (२० हजार) संतोष पिंपळकर (४१ हजार, रामुभाऊ गणपत शेंडे (२ लाख ६५ हजार) आदींसह अन्य शेकडो नागरिकांची वीजचोरी पकडण्यात आली. वीज वितरण कंपनीने मीटर दुरूस्ती मोहीम राबवून हजारो ग्राहकांच्या समस्या दूर केल्या. वीज देयकात सुधारणा करून अखंडित वीज पुरवठा केला जात आहे. पण काही व्यक्ती मीटरमध्ये तांत्रिक बिघाड व अन्य प्रकारे छेडछाड करून शासनाचे नुकसान करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वीज चोरी सामान्य घटना नसून एक सामाजिक गुन्हा आहे. वीजचोरी करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर २००३ अंतर्गत कलम १२६ नुसार दंड आकारण्याची तरतूद आहे.
महावितरणचे स्थानिक विभाग, उपविभाग व शाखा अभियंत्यांनी वीजचोरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याने यापुढे होणाºया राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान टाळले आहे.
अशा आहेत शिक्षेच्या तरतुदी
कलम १३५ : परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे विजेचा वापर केल्यास या कलमाअंतर्गत वीजचोरी ठरते. कलम १३६ व १३७ : वीजतारांची चोरी किंवा साहित्याची चोरी खरेदी केल्यास शिक्षेची तरतूद आहे. साहित्याची चोरी करणाºया व्यक्तिला सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. कलम १३८ : बेकायदेशीरपणे मीटरची छेडछाड करून वीजचोरी केल्यास या कलमाअंतर्गत शिक्षा होऊ शकते. याकरिता तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. कलम १३९ नुसार वीजेचा वापर बेजबबादारपणे केल्यास बहुमुल्य विजेचा अपव्यय कलमांतर्गत १० हजार रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती मुख्य अभियंता महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.