रस्त्यावर फिरणाऱ्या ४६ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:31+5:30

जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काळात घरामध्ये राहणे योग्य राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशवारी करून आलेल्या व नोंद झालेल्या नागरिकांची संख्या १०६ असून सध्या ४५ नागरिक निगराणीत आहे. ६१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे.

Action against 46 people who are on the road | रस्त्यावर फिरणाऱ्या ४६ जणांविरुद्ध कारवाई

रस्त्यावर फिरणाऱ्या ४६ जणांविरुद्ध कारवाई

Next
ठळक मुद्देआजपासून पोलीस विभाग होणार सक्त : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून घराबाहेर न पडण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था प्रशासन करीत आहे. जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थादेखील या कामी पुढे आल्या असून वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचा यासाठी पाठबळ मिळत आहे. तरीही अनेकजण शुक्रवारी विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळले. पोलीस प्रशासनाने रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या ४६ जणांवर गुन्हे दाखल केले असून शनिवारपासून आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काळात घरामध्ये राहणे योग्य राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशवारी करून आलेल्या व नोंद झालेल्या नागरिकांची संख्या १०६ असून सध्या ४५ नागरिक निगराणीत आहे. ६१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. सध्या कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसून नागरिकांनी पुढील १४ तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये. कोरोना विषाणू संसर्गाची चेन तोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरातील माहिती येत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी या शासकीय कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक न दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या बैठकीमध्ये सर्व स्वयंसेवी संस्था, तसेच धान्य व किराणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे आवाहन केले की, शहर व ग्रामीण भागात आशा वर्कर महानगरपालिका कर्मचारी यांच्यामार्फत सुरू असणाºया सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.
शहराच्या आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असून त्यांना योग्य माहिती व योग्य सन्मान द्यावा, जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत निराश्रित व गरजू नागरिकांना तयार जेवणाची व्यवस्था करण्यात येईल,असे विविध स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक प्रतिनिधींनी आपले मत मांडले. त्याचप्रमाणे शहरातील बेघर लोकांची यादी तयार करण्याचे काम मनपामार्फत सुरू करण्यात आले आहे.

सर्व होर्डिंगवर होणार जनजागृती
शहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना जनजागृती विषयक सूचना देण्यात येणार आहे. तसेच शहरातील बीपीएल शिधापत्रिकाधारकांना शुक्रवारपासून एक महिन्याचे धान्य वाटप सुरू केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील परवापासून अन्नधान्य वाटपाला सुरुवात होणार आहे. आपल्या रेशन कार्डवर हे अन्नधान्य मिळणार असून रेशन दुकानापर्यंत जाण्यासाठी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निजंर्तुकीकरण
कोरोना विषाणू (कोविड-१९) प्रतिबंधाकरिता नागरी व ग्रामीण क्षेत्रातील शासकीय कार्यालय, सार्वजनिक संस्था, सार्वजनिक बागा, सर्व शाळा, कॉलेज, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, सार्वजनिक वाचनालय इत्यादी सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एमआयडीसीमध्ये तयार होणार सॅनिटायझर
चंद्रपूर एमआयडीसीमध्येच सॅनिटायझर तयार करण्यासाठी काही उद्योग समूहांना आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक आस्थापना आम्ही बंद करायला सांगितले. तरी त्यांना या काळात पगार मात्र बंद करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

आजपासून गंजवार्डातील भाजी मार्केट कोहिनूर तलावात
चंद्रपूर : शहरातील गंजवार्डातील भाजी मार्केटमधील गर्दी लक्षात घेता संसर्ग टाळण्यासाठी महानगर पालिकेतर्र्र्फे शनिवारपासून गंजवार्ड येथील किरकोळ भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी कोहिनूर तलावात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे कुठल्याही चिल्लर विके्रत्यांना गंजवार्ड येथील मार्केटमध्ये विक्री करता येणार नाही. याठिकाणी केवळ लिलाव करणाऱ्या गाळेधारकांनाच सकाळी ९ वाजेपर्यंत व्यवसाय करता येणार आहे. मात्र चिल्लर स्वरूपाचा माल विकत येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दोन व्यक्तीत तीन फूट अंतर ठेवणे गरजेचे असून मास्क व सॅनिटायझर वापरून वापर करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी वतुर्ळातच उभे राहून खरेदी करण्याचे आवाहन मनपाने केले.

ज्युबिली हायस्कूलमध्ये कम्युनिटी किचन
महानगरपालिके मार्फत जिल्ह्यामध्ये निराश्रित, बेघर लोकांची यादी तयार करणे सुरू आहे. ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची यंत्रणाच नाही, बेघर, निराश्रित आहे, अशाच नागरिकांना स्वयंसेवी संस्थांमार्फत व महानगरपालिकेमार्फत तयार अन्न पुरवले जाणार आहे. यासाठी एकत्रित जुबिली हायस्कूल या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत कम्युनिटी किचन उभारले जाणार आहे. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थांमार्फतदेखील तयार झालेले अन्न वाटप करण्यात येणार आहे. मात्र वितरणाची यंत्रणा महानगरपालिका राबविणार आहे.

जिल्ह्यात होणार मांसविक्री सुरू
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, या संचारबंदीच्या कालावधीत मांस विक्री सुरू राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे. मांस विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरिता मांस विक्रीधारकांस एका वेळेस दोन पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही, याची दक्षता देण्यासंबंधी निर्देश देण्यात यावे. तसेच दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याकरिता एक मीटर अंतरावर चौकोनी सीमांकन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना
सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे होत आहे. परिवहन कार्यालयाची गर्दी टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाचे इमेल वर असे अर्ज स्वीकारावेत. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नमूद वाहनात तात्काळ प्रमाणपत्र जारी करावी व त्यांची नोंद स्वतंत्र नोंदवही ठेवावी. जारी केलेले प्रमाणपत्र अर्जदाराचे इ-मेल वर स्कॅन करून पाठवावे व प्रमाणपत्रावर स्कॅन कॉपी सेंट फ्रॉम आॅफिस अशी टीप टाकावी, अशी माहिती परिवहन उपआयुक्त(प्रशासन) जितेंद्र पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Action against 46 people who are on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.