एकाच रात्री रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:00 AM2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:41+5:30

शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदी येथील भिवनी घाट येथून रेतीची तस्करीीह तो असल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दहा टॅक्टरमध्ये रेती अवैधरित्या भरण्यात येत होती. त्यामुळे त्या दहा टॅक्टर जप्त करुन त्यांच्यावर कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोंभुर्णा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

Action against ten persons for illegal transport of sand in one night | एकाच रात्री रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दहा जणांवर कारवाई

एकाच रात्री रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दहा जणांवर कारवाई

Next
ठळक मुद्देदहा ट्रॅक्टर जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रक्टर जप्त केले. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने रेतीतस्काराचे धाबे दणाणले        आहेत.
विनय गंगाधर आलम (२९) रा. कुर्डीहेटी, तृषाल रामदास पिंपळकर (२२) रा. कुर्डीहेटी, सचिन वासुदेव गौरकर (३०) रा. वासनकौठी, विजय श्रीनिवास आत्राम (३६) रा. भीमनी, रोशन भगीरथ नरसपुरे (२६) रा. वेळवा, स्वप्नील शंकर पिंपळशेंडे (२७) रा. चेकठाणा वासना, गोपीनाथ भगवान सिडाम (३५) रा. चेक खापरी, पुरुषोत्तम दिलीप पिदुरकर (३०) रा. मोहाडा, दीपक कातरुजी शुभ्रत्कर (३०) रा. घाटकूळ, राजू काशीनाथ गोंधळी (३५) रा. भीमनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे रेतीची वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक़ बाळासाहेब खाडे यांना पथक नेमण्याच्या सुचना दिल्या. शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदी येथील भिवनी घाट येथून रेतीची तस्करीीह तो असल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दहा टॅक्टरमध्ये रेती अवैधरित्या भरण्यात येत होती. त्यामुळे त्या दहा टॅक्टर जप्त करुन त्यांच्यावर कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोंभुर्णा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांनी केली

 

Web Title: Action against ten persons for illegal transport of sand in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.