अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:27 AM2021-02-10T04:27:56+5:302021-02-10T04:27:56+5:30
सहा ट्रक, पोकलँड मशीन, हायवा व ट्रक जप्त चंद्रपूर: जिल्हा खनिकर्म अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने दिंडोरा, प्रकल्प ...
सहा ट्रक, पोकलँड मशीन, हायवा व ट्रक जप्त
चंद्रपूर: जिल्हा खनिकर्म अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने दिंडोरा, प्रकल्प ता.वरोरा वर्धा नदीपात्रामध्ये धाड टाकून अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी सहा ट्रक, पोकलँड मशीन, हायवा व ट्रक जप्त केले.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता सोमवारी सकाळी ८.३० वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने दिंडोरा, प्रकल्प ता.वरोरा वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती,वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या वाहानाची तपासणी करण्यात केली असता, विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या वाहन ट्रॅक्टर क्र. एम.एच.३४/ ९३९४, एल४७४३, एल.०६४८, एल.९४९३, बी. आर.४५७२, बी.एफ.७२६८ असे एकूण ०६ ट्रॅक्टर, पोकलँड मशीन एक, हायवा क्र. एमएच१३ जेबी-१६९० व हाफटन ट्रक एम.एच.३४ एफ १५४९ जप्त केले. त्यानंतर, दिंडोरा येथील पोलीस पाटील वर्षा गिरीधर मसारकर यांच्यासह सुपुर्दनाम्यावर सुपुर्द करण्यात आले आहे. या वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६च्या कलम ४८च्या पोट कलम (७) (८)च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.