दुग्ध क्रांतीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:18 PM2018-03-03T23:18:28+5:302018-03-03T23:18:28+5:30

जिल्ह्यातील पशुधनाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांची बळकटी करणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यात दुग्ध क्रांतीसाठी शासकीय व केंद्रीय दुध डेअरींच्या संकलन व्यवस्थेचे नियोजन आवश्यक असून त्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यात यावा, ....

'Action Plan' for the milk revolution | दुग्ध क्रांतीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’ करा

दुग्ध क्रांतीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’ करा

Next
ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांचे निर्देश : मुद्रा व अन्य विभागाच्या योजनांचीही घेतली माहिती

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील पशुधनाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांची बळकटी करणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यात दुग्ध क्रांतीसाठी शासकीय व केंद्रीय दुध डेअरींच्या संकलन व्यवस्थेचे नियोजन आवश्यक असून त्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे दिले.
स्थानिक नियोजन भवन येथे शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश दिले. यासोबतच जिल्हाभरातील पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने, तेथील वैद्यकीय व्यवस्था या संदर्भातही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. मदर डेअरी, शासकीय दुग्ध विकास अधिकारी कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, यासोबतच पतपुरवठा करणारे बँकेचे अधिकारी, मुद्रा बँक योजनेचा आढावा, खासदार निधीचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, सभापती ब्रिजभुषण पाझारे, सभापती अर्चना जीवतोडे, सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होते. मदर डेअरी दुध खरेदी करण्यास असमर्थ असेल तर शासकीय दुध डेअरीने दूध खरेदी करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तथापि, अचानक शासकीय दूध डेअरीला वाढीव खरेदी करता येणे शक्य नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. या संदर्भातील गुंता सोडविण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांचे, दुग्ध व्यवसायिकांचे दूध वाया जाता कामा नये, असेही ना. अहीर म्हणाले.

Web Title: 'Action Plan' for the milk revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.