फूटपाथ विक्रेत्यांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:41+5:302021-01-03T04:29:41+5:30
नुकसान भरपाई देण्याची मागणी चंद्रपूर : तालुक्यात कपाशीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यंदा कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाले. ...
नुकसान भरपाई देण्याची मागणी
चंद्रपूर : तालुक्यात कपाशीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यंदा कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन उत्पादनात घट झाली. कृषी विभागाने सर्वेक्षण केले. पण, भरपाई मिळाली नाही. कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
ग्राम राजस्व अभियान सुरू करावे
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण आता कमी होत असल्याने जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियानाची गरज आहे. या अभियानामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळते. ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने तहसील व पंचायत समितीकडून अभियान सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा
राजुरा: वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील दुर्गम गावांंमध्ये वीज बंद राहत असल्याने कृषिपंपांवर अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बिल भरले नाही. वीज वितरण कंपनीने बिल दुरुस्ती मोहीम सुरू केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार बंद झाले नाही.