वर्षभरात सहा हजार वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:33 AM2019-01-04T00:33:20+5:302019-01-04T00:35:54+5:30

वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Action taken against 6,000 drivers in the year | वर्षभरात सहा हजार वाहनधारकांवर कारवाई

वर्षभरात सहा हजार वाहनधारकांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे१३ लाखांचा दंड : अवैध वाहतृूक, मद्यपींवर पोलिसांची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ पर्यंत एक वर्षाच्या काळात १३ लाख एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या व नुकतेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या. बेदरकार वाहनचालकांवर नजर ठेवून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी राजुरा वाहतूक शिपायांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राजुरा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत २८३ भांदवि कायद्यांतर्गत रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १५५ वाहनधारकांवर ३१ हजार रुपये दंड, मोटार वाहने कायदा १८५ अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाºया ५८ वाहनधारकांवर ४० हजार सहाशे रुपये, कलम २७९ भादंविअंतर्गत निष्काळजी व भरधाव वाहन चालविणाºया १४ वाहनधारकांवर १४ हजार रुपये दंड, अन्य कलमांतर्गत सहा हजार ५८ वाहनधारकांवर १२ लाख पंधरा हजार चारशे रुपये दंड आकारल्यात आला.
यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाया पोलीस उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांच्यासोबत वाहतूक कर्मचारी, नायब पोलीस शिपाई प्रशांत येंडे, विनोद लोखंडे, राधेश्याम यादव आदींनी केली.
वाहतुकीची समस्या
शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर राजुरा पोलीस विभागाची करडी नजर असून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनधारकाची संख्या, त्यातल्या त्यात शहरातील वाढलेले अतिक्रमण यामुळे शहरातील रस्त्याची अवस्था बिकट झालेली दिसून येत आहे. शहराच्या मध्यभागातून राज्य महामार्ग गेल्याने शहरात नेहमीच वाहतुकीची समस्या बनलेली आहे.

Web Title: Action taken against 6,000 drivers in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.