अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:27+5:302021-05-12T04:29:27+5:30
कोविड परिस्थितीत पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोरोनामुळे ...
कोविड परिस्थितीत पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोरोनामुळे इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोरोना आजाराने दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे बालकांची अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा आपल्या कुटुंबीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.
येथे साधा संपर्क
राज्यात कुठेही कोरोना आजाराने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास चाईल्ड लाईन-१०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्राच्या स्टेट ॲडोप्शन रिसोर्स ॲथोरिटीच्या क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती तसेच जवळच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.