विकासकामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:27+5:302021-07-31T04:28:27+5:30

पालकमंत्र्यांचे निर्देश : सावली तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा चंद्रपूर : सावली तालुक्यात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू ...

Action will be taken against those who waste development work | विकासकामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणार

विकासकामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणार

googlenewsNext

पालकमंत्र्यांचे निर्देश : सावली तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा

चंद्रपूर : सावली तालुक्यात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विकास कामे तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी गांभीर्याने काम करावे. स्थानिक लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे जे अधिकारी - कर्मचारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सावली तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सभापती विजय कोरेवार, राकेश गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, नितीन गोहणे, राजू सिदम, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी निखिल गावडे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कटरे, विद्युत वितरणचे उपअभियंता खरकटे, जि.पचे बांधकाम उपअभियंता गोंगले प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले होते. कामांना दिलेला निधी, ठरावाअभावी खर्च होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून सदर कामे पूर्णत्वास न्यावी. विकास कामांना खिळ बसता कामा नये, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना तसेच गरजू निराधारांना अन्नधान्याचे वाटप वेळोवेळी करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बाॅक्स

यांच्यावर होणार कठोर कारवाई

जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. पावसाळ्यात कोणताही अधिकारी गैरहजर राहत असेल किंवा सेवा बजावत नसेल व अशा कारणाने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी बजावले. ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील. त्या जागेवर दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती होईपर्यंत सदर अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

300721\30cpr_5_30072021_32.jpg

विकास कामांचा आढावा घेताना पालकमंत्री ना. विजय वडेड्टीवार तसेच अन्य अधिकारी.

Web Title: Action will be taken against those who waste development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.