विनाकारण उभ्या जड वाहनावर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:57+5:302020-12-25T04:22:57+5:30
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मधातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. अश्यात दररोज या मार्गावर व्यस्त वाहतुकीची वर्दळ असते. परंतु ...
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मधातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. अश्यात दररोज या मार्गावर व्यस्त वाहतुकीची वर्दळ असते. परंतु या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे ठाणेदार उमेश पाटील यांनी विनाकारण उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाईचे संकेत वाहन मालकास दिले आहे.
बल्लारपुरातील दोन्ही दिशेला उद्योगाचे जाळे असल्यामुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर दिवसभर सिमेंट व फ्लाय ऐश घेऊन जाणाऱ्या जड वाहतुकीची वर्दळ असते. पेपरमिल राममंदिर चौकापासून तर बामणीपर्यंत मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने २४ तास जड वाहने उभे ठेवण्याची फॅशनच झाली आहे. पेपरमिल परिसर,लाकूड डेपोपासून तर बीटीएस प्लेटपर्यंत बामणी परिसर जड वाहने ठाण मांडून उभी राहतात. यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे.तर काही ठिकाणी भंगार वाहने पडून आहे.रस्ते अतिक्रमणाने वेढले आहे.यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या बाजूने उभे राहणारे वाहन हटवा म्हणून अनेकदा शहरातील संघटनांनी पोलीस ठाण्यात निवेदन ही दिले आहे परंतु अजूनही उभ्या ट्रकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
कोट
शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या मालकांची बैठक घेतली असून रस्त्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या वाहन मालकास वाहन न ठेवण्याचे एका आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे नाही हटविल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
= उमेश पाटील,पोलीस निरीक्षक,बल्लारशाह
फोटो सडकेच्या बाजूला उभे असलेली वाहने
= मंगल जीवने