क्षयरुग्णांची नोंद न ठेवणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:40 AM2019-05-30T00:40:04+5:302019-05-30T00:40:55+5:30

क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Action will be taken to the hospital not keeping the tuberculosis vaccine | क्षयरुग्णांची नोंद न ठेवणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई

क्षयरुग्णांची नोंद न ठेवणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देक्षयमुक्तीसाठी पाऊल : रुग्णांना पोषण आहारासाठी मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५ च्या) कलम २६९ आणि २७० च्या अंतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोई सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तसेच निक्षय पोषण योजनेअंतर्गत रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत रुग्णांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु बºयाच रुग्णांची नोंद झाली नसल्याने दर दीड मिनिटाला एक क्षयरुग्णाचा मृत्यू होतो.
तसेच बहुतेक रुग्णांचा क्षयरोगाचे निदानापासून तसेच औषधोपचार यापासून वंचित राहतात. या रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी, याकरिता केंद्र सरकारने निक्षय नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केलेली आहे. रुग्णांची नोंद करणाºया वैद्यकीय व्यवसायिकाला ५०० रुपये मानधन, रुग्णांचा उपचार पूर्ण करून घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन, रुग्णांचे उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाºया उपचार सहाय्यकास ड्रग सेंसेटिव्ह रुग्णांना एक हजार रुपये, एमडीआर रुग्णामागे पाच हजार रुपये, रुग्णांना आवश्यक तपासणीसाठी ५०० रुपये मानधन अशा विविध सुविधा देण्यात येत आहे. रुग्णालयांनी क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता अंतर्गत शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निक्षय अ‍ॅप
देशातील कोणत्याही कानाकोपºयातल्या क्षयरुग्णांची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येईल. ज्या रुग्णांची नोंदणी झाली त्यांना एक युनिक आयडी देण्यात येते. याअंतर्गत प्रत्येक रुग्णांच्या उपचाराची स्थिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती संग्रहित असते. याद्वारे रुग्णांना कोणत्याही क्षयरोग केंद्रात उपचार करून घेता येतो. या अ‍ॅपला रुग्णांच्या बँक खात्याला जोडलेले आहे. तसेच रुग्णांना पोषण आहारासाठी जी आर्थिक मदत दिली जाते, त्याची स्थिती पाहता येणार आहे. ती आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्यास या अ‍ॅपवर तक्रार करता येते. अशा सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

Web Title: Action will be taken to the hospital not keeping the tuberculosis vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य