ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १४ हजार २७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:15+5:302021-05-10T04:28:15+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार २७ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान, ...
चंद्रपूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार २७ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान, मागील २४ तासात २ हजार १५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार १८० नव्या रुग्णांची भर पडली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७१ हजार ७२८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५६ हजार ५९९ झाली आहे. सध्या १४ हजार २७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख १२ हजार ५८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ३६ हजार ६३९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ५५ वर्षीय पुरुष, महाकाली वाॅर्ड येथील ४२ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, नेहरू नगर वाॅर्ड परिसरातील ७० वर्षीय पुरुष, संजय नगर येथील ६० वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय महिला, ५७ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय महिला, जीवन ज्योती कॉलनी रामनगर परिसरातील ५५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील ४० वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ८१ वर्षीय पुरुष, चिखल परसोडी येथील ६२ वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील ६२ वर्षीय पुरुष, करंजी येथील ६० वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील काजळसर येथील ३५ वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील ४२ व ५० वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १,१०२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,०१७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३४, यवतमाळ ३४, भंडारा १०, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
रविवारचे बाधित
चंद्रपूर पालिका क्षेत्र ३७४
चंद्रपूर तालुका ५८
बल्लारपूर ११४
भद्रावती ९१
ब्रम्हपुरी ३५
नागभिड २७
सिंदेवाही १२
मूल १२५
सावली ३५
पोंभुर्णा ०४
गोंडपिपरी ४९
राजुरा ५०
चिमूर २५
वरोरा १०५
कोरपना ५३
जिवती ०७
इतर-१६