कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:13+5:302021-06-01T04:21:13+5:30

चंद्रपूर : आज जनता संकटात आहे, तेव्‍हा आमच्‍यासाठी खुर्ची नाही तर सेवा महत्त्वाची आहे. मागील सात वर्षात मोदी सरकारने ...

Activists should celebrate service week by serving the community | कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा

कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा

Next

चंद्रपूर : आज जनता संकटात आहे, तेव्‍हा आमच्‍यासाठी खुर्ची नाही तर सेवा महत्त्वाची आहे. मागील सात वर्षात मोदी सरकारने देशहिताची अनेक कामे केली, परंतु ही लढाई अजून संपलेली नाही. मोदीजींच्‍या विचारावर संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते सेवाभावी वृत्‍तीने कोरोनाच्‍या संकटातही कार्य करीत आहे. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा, असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑक्‍सिजन कॉन्‍सन्ट्रेटरच्‍या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते २५ ऑक्‍सिजन कॉन्‍सन्ट्रेटरचे लोकार्पण करण्‍यात आले. चंद्रपूर महानगर, ब्रम्‍हपुरी, नवेगाव मोरे, ताडाळी, कोरपना, विरूर व मुल येथील मुख्‍य पदाधिकाऱ्यांना सुपुर्द करण्‍यात आले. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, कामगार मोर्चा प्रदेश सचिव अजय दुबे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष (शहर) विशाल निंबाळकर, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) आशिष देवतळे, मनपा सदस्‍य संजय कंचर्लावार, देवानंद वाढई, छबू वैरागडे, मुल नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, जिल्‍हा महिला आघाडी अध्‍यक्षा (ग्रामीण) अलका आत्राम, विवेक बोढे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

कोविड १९ च्‍या संकटात जी मुले कोरोनामुळे अनाथ झाली. त्‍यांच्‍यासाठी पी.एम. केअर फंडातून संपूर्ण शिक्षणासाठी व वयाच्‍या २३ व्‍या वर्षी १० लक्ष रु. देण्‍याची घोषणा मोदीजींनी केली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील अशा कुटुंबामागे भाजपा कार्यकर्त्‍यांनी उभे राहून त्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

Web Title: Activists should celebrate service week by serving the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.