ब गटाच्या जमिनी अ गटात समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:49 PM2017-11-27T23:49:14+5:302017-11-27T23:49:37+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या जमिनी ‘ब’ गटात समाविष्ट असल्याने जमीन मालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या जमिनी ‘ब’ गटात समाविष्ट असल्याने जमीन मालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एखादे बांधकाम करण्याचीसुद्धा परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जमिनी आमच्या असूनही त्यावर आमचा अधिकार नाही. मालकी हक्काच्या जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या ‘ब’ गटातील जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट करण्यात याव्या, या मागणीसाठी सोमवारी भूमिअभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
लोकांच्या सर्व जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट करण्यात याव्या, त्याचप्रमाणे जनतेच्या थकीत असलेल्या फेरफारची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी, केवळ एका प्लाटच्या मोजणीसाठी संपूर्ण जमिनीचे पैसे भरावे लागते. ती अट रद्द करण्यात यावी, या मागण्याही यावेळी लावून धरण्यात आल्या.
स्वत:च्या ज्या जमिनी मालकी हक्काच्या आहेत. तसेच ज्या जमिनीच्या हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध नाहीत व नझूल खसºयात अहस्तांतरणीय नमूद नाही, ज्यांची ७५ टक्के अनिर्जित रक्कम भरली आहे, त्यांना १२.५ टक्के अनिर्जित रक्कम शासनाकडून देण्यात यावी, अशीही मागणी आहे. हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध खसºयात नमूद नसताना मिळकत पत्रिकेत ‘ब’ दाखविले असल्याने चंद्रपूर येथील जनतेला याचा नाहक त्रास होत आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या धरणे आंदोलनात नगरसेवक विशाल निंबाळकर, माया पटले, सायली येरणे, मुन्ना लोढे, इरफान शेख, कलाकार मल्लरप, विलास वनकर, किशोर बोबडे, दीपक पद्मगिरवार, कैलास धायगुडे, राहुल मोहुर्ले, सुधीर माजरे, विनोद गरडवा, विनोद गोल्लजवार, शांता धांडे, राजेंद्र पुल्लीपाका, राशीद हुसैन, अशफाक राजाखान, सिकंदर दुर्गे, आनंद रणशूर, मुन्ना जोगी, रामेश्वर हिकारे, लक्ष्मण बोबडे, सुमेश रंगारी, स्वप्नील वाढई, दिलीप बेंडले, गौरव जोरगेवार, विलास सोमलवार, माला तुरारे, लक्ष्मण टोकला, टिकाराम गावंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.