‘त्या’ २० गावांना पूर्ववत नागभीडलाच जोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:35 PM2018-07-14T22:35:26+5:302018-07-14T22:35:52+5:30

तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

Add those '20' villages to the urban areas | ‘त्या’ २० गावांना पूर्ववत नागभीडलाच जोडावे

‘त्या’ २० गावांना पूर्ववत नागभीडलाच जोडावे

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
तळोधी अप्पर तालुक्याची निर्मिती करताना ज्या गावांना नागभीड सोयीचे आहे अशी मिंडाळा ,कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी,गोवारपेठ, वासाळा मेंढा, किटाळी मेंढा ही २० गावे तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्यात आली आहेत.
या गावांना तळोधीचे अंतर नागभीडच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे वेळ वाया जातो. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. ही गावे नागभीड तालुक्यातच ठेवावी, अशी मागणी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली. यावेळी कोसंबी गवळीचे सरपंच रंजु गायकवाड, उपसरपंच मच्छिंद्र चन्नोडे, वासाळा मेंढाचे सरपंच वाटकर,नवेगाव हुंडेश्वरीच्या सरपंच वैशाली पारधी, माजी सरपंच दादाजी सोनुले मिंडाळाचे उपसरपंच विनोद हजारे, गवळी येथील आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजू चौधरी, ग्रा. पं. सदस्य टेंभुर्णे, सदानंद पिलारे,गुरूदेव नागापुरे व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Add those '20' villages to the urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.