पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:58 PM2019-02-14T22:58:50+5:302019-02-14T22:59:12+5:30

राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

Add water, forest resources to the school curriculum | पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातून राज्यव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.
वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या कार्यशाळेत उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अधीक्षक अभियंता वेमलकुंडा, आनंद पुसावळे, कौस्तुभ आमटे, प्रशांत खाडे आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्राततील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धन, संरक्षण, जनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक, जलदूत, जनकर्मीसाठी घेतलेली कार्यशाळा प्रेरणादायी ठरणार आहे. चंद्रपुरातून जलसाक्षरतेचा संदेश देणाºया जलसंवाद यात्रेच्या जलकुंभाचे विधीवत पूजन करण्यात आले.
ना. मुनगंटीवार म्हणाले, शिक्षण विभाग माझ्याकडे नसला तरी महाराष्ट्र शासनाकडून जल आणि जंगल याबाबतीत जागरूकपणे कामे केली जात आहेत. जलसमस्या निर्माण होऊ नये, याकरिता शासन कटीबद्ध असून नागरिकांची मानसिकता तयार केली जात आहे. डॉ. राजेंद्र सिंग यांनी पाणी प्रश्नासाठी दीर्घकालिन उपाययोजना सुचविल्या, याची हमखास दखल घेतल्या. जाईल. पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळ अतिशय सकारात्मक आहे. जलसंवाद यात्रेतून संकटांवर मात केल्या जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.पांडे यांनी जलसंवाद यात्रेच्या स्वरूपाची माहिती दिली. अन्य तज्ज्ञांनीही विविध पैलुंवर प्रकाश टाकला. संचालन हेमंत शेंडे यांनी केले. अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी आभार मानले.
वृक्षाच्छादन वाढल्यास बरसेल पाऊस-राजेंद्र सिंग
विविध पिकांचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. या राज्यात वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. वृक्षाच्छादन वाढले तर पाऊस बरसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती व सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड मोहिमेला सहकार्य करावे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.

Web Title: Add water, forest resources to the school curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.