सिरसी येथे व्यसनमुक्ती सोहळा
By admin | Published: April 17, 2017 12:42 AM2017-04-17T00:42:14+5:302017-04-17T00:42:14+5:30
दारुच्या व्यसनात बुडालेल्या नागरिकांचे जीवन दारुमुक्त करुन त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ सिरसी येथे शेषराव महाराज यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चंद्रपूर : दारुच्या व्यसनात बुडालेल्या नागरिकांचे जीवन दारुमुक्त करुन त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ सिरसी येथे शेषराव महाराज यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्रीबाई ढोबळे होत्या. तर ठाणेदार लेनगुरे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर गुरनुले, करुटकर, कीर्तनकार मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात ते म्हणाले की दारुबंदी झाल्यापासून दारुचे व्यसनी असलेले नागरिक दारु कुठे मिळेल, याचा पत्ता करुन आपले दारुचे व्यसन पूर्ण करीत असतात. यातच त्यांना लगाम लावणे हे आमच्या कार्यातून कठीण झाले आहे. अशा व्यसनी नागरिकांना दारुच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थाचीच खूप महत्वाची भूमिका असते, असे ते म्हणाले. तसेच यावेळी दारूच्या दुष्परिणामाबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो नागरिक तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व प्रदेश सचिव संजय बुटले यांनी केले. संचालन करुडकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)