जिल्ह्यातील नागरिकांसह, पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या दाहकतेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:08 AM2019-05-16T00:08:17+5:302019-05-16T00:08:59+5:30
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.
रोज दिवसभर नजरेस पडणारे पक्षी सध्या उन्हाच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करीत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहनांचा शुकशुकाट असतो. अलिकडे बदललेल्या तापनामाचा फटका शहराबरोबर ग्रामीण भागावरही पडला आहे.
यापूर्वी ग्रामीण भागात भरपूर झाडे-झुडपे बघायला मिळत होते. परंतु, अलिकडे या सर्व बाबी नष्ट होताना दिसत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागाचेही चित्र पालटले आहे. गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, घरांमध्ये झाडाझुडपांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातही तापमानाने उच्चांक गाठला आहे.
ग्रामीण भागात शेतकरी व मजुरवर्ग मोठ्या प्रमाणता आहे. हे दोन्ही वर्ग श्रमिक आहेत. या दोन्ही वगार्तील लोकांचा चरितार्थ चालविण्यासाठी उन, वारा, पाऊस झेलून काम केल्याशिवायच गत्यंतर नाही. मोठमोठ्या इमारती झोपडी व झाडांच्या आडोशाला घरटी बांधून राहणाऱ्या पक्ष्यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
दिवसभर घराच्या किंवा मानवी वस्तीत उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक पक्षी नजरेस पडत नाहीत. नागरिकांचा निसर्गात वाढता हस्तक्षेप व त्यामुळे निर्माण झालेल्या तापमानात वाढ याचाच हा दुष्परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.
निसगार्चा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरट्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान पक्ष्यांसाठी घातक आहे.
वाढत जाणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी बºयाच पक्ष्यांनी झाडे, झुडपे, घरे, इमारतीमध्ये आश्रय घेतला असून या पक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे म्हणून पक्षीप्रेमी पक्ष्यांसाठी सहानुभमी दर्शवित असले तरी वाढत्या उन्हामुळे पक्षी मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत असून उन्हापासून बचाव करीत आहे. वाढत्या उन्हाचाही पक्षांवर मोठा फरक जाणवू लागला आहे.