वरोºयात पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:53 PM2017-09-03T21:53:59+5:302017-09-03T21:54:13+5:30

In addition to the Police Health Camp | वरोºयात पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

वरोºयात पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देएक हात मदतीचा : वरोरा मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाºया पोलीस बांधवांच्या आरोग्याकरिता पत्रकारांनी पुढाकार घेणे, हे महत्त्वपूर्ण कार्य असून समाजातील प्रत्येक घटकाने या आदर्शवत कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले.
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वरोरा पोलिसांसाठी वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश पानसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आसावरी देवतळे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पत्रकार सुनील बोकडे, राजू कुकडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धनवलकर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. आसावरी देवतळे यांनी वैद्यकीय अधिकाºयांनी समाजाचा मुख्य घटक म्हणून पोलीस बांधवाच्या आरोग्यदायी भविष्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ.आसावरी देवतळे यांनी स्वत: महिला पोलीस व कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी केली.
कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा लोकमतचे शहर प्रतिनिधी आशिष घुमे व गोंडपिपरीचे तालुका प्रतिनिधी वेदांत मेहरकुरे यांनी केले. या आरोग्य शिबिरात शहरातील डॉ. आशिष चवले, डॉ. नितीन पाटील, डॉ.विवेक लेला, डॉ. अक्षय विधाते, डॉ. दिलीप सावनेरे, डॉ. वैभव कष्टी, डॉ. राकेश पिंपळकर या डॉक्टरांच्या चमूने आरोग्य तपासणी केली तर उपजिल्हा रुग्णालय येथील विवेक वनकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तनिस्का खडसानेश, अधिपरिचारिका श्रुती चवले, समुपदेशक नेहा इंदोरकर यांनी पोलीस बांधवाची मधुमेह रक्त तपासणी केली. कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार शाम ठेंगडी, महिला समुपदेशक योगिता लांडगे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व शिबिरात सहभागी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

लोकमतच्या प्रतिनिधीचे कौतुक
लोकमतचे वरोरा शहर प्रतिनिधी आशिष घुमे यांच्या संकल्पनेतून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत सहा महिन्यापासून गरीब रुग्णांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या पुढील उपचाराकरिता पाठपुरावा करण,े असे उपक्रम सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत तालुक्यातील निशा प्रमोद मैती व विधी मेश्राम यांना पुढील उपचार घेता येत आहे. निशा मैती या गरीब महिलेच्या उपचाराकरिता जवळपास १२ लक्ष रुपये खर्च आहे. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाखाली मदतीचे आवाहन केल्यानंतर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आशिष घुमे यांचे कौतुक करून डॉ. आसावरी देवतळे व अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी दहा हजार रूपये व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पाच हजाराची मदत कार्यक्रमात जाहीर केली.

Web Title: In addition to the Police Health Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.