बुध्दवचन ‘पाली-भाषा’ संविधानात समाविष्ट करा
By admin | Published: June 19, 2016 12:37 AM2016-06-19T00:37:41+5:302016-06-19T00:37:41+5:30
भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भिक्खू संघाची मागणी
चंद्रपूर : भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे. परंतु भारतातील बौध्दधर्मीय १५ कोटी लोकांच्या पाली भाषेचा समावेश नाही. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३४४ (१), ३५१(१) अन्वये अनुसूची ८ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सभासद भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांनी केली आहे.
भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाने अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन पाठविले.
भारत देशाचा इतिहास इ.स. पूर्व सहावे शतक बुध्द जन्म तिथीपासून सुरू होतो. प्राचीन स्तुप, चैत्य, उदयान, वन (अरण्यं), पुष्पकरणी, जननपद, निगम, शिलालेख, स्तंभलेख, अभिलेख, लेणी लेख, शिल्प, नाणी यातील पाली भाषा आणि ‘ब्रह्मी, खरोष्टी’ लिपीमध्ये बौध्द धर्मिय पाली भाषेत प्राचीन साहित्य जतन करून ठेवण्यात आले आहे. पाली भाषा भारताची ओळख आहे. तरी सुद्धा राज्यकर्ते या भाषेप्रति उदासीन असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ बुध्दगयाचे आजीवन सभासद भदन्त धम्मप्रकाश भदन्त श्रद्धारक्षित समपा समुेध स्मण सुमंगल आंबोरी वर्धा, समण चेत्तिय बोधी आंभोरा नागपूर हे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)