पदोन्नत झालेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आठ दिवसांवर

By admin | Published: July 17, 2014 12:00 AM2014-07-17T00:00:58+5:302014-07-17T00:00:58+5:30

आरटीअ‍ॅक्टनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आज करण्यात येणार होते. मात्र पदवीधर शिक्षक आणि सेवाज्येष्ठता यातील कोणत्या

Adjustment of promoted headmasters in eight days | पदोन्नत झालेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आठ दिवसांवर

पदोन्नत झालेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आठ दिवसांवर

Next

चंद्रपूर : आरटीअ‍ॅक्टनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आज करण्यात येणार होते. मात्र पदवीधर शिक्षक आणि सेवाज्येष्ठता यातील कोणत्या शिक्षकांना प्राधान्यक्रम द्यायचा यावर संभ्रम झाल्याने आता या शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले आहे.यासाठी आता शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भाद बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्याची चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, समायोजनासाठी विविध संघटनांनी आपआपले मद देऊन अधिकाऱ्यांचा संभ्रम वाढविला आहे. त्यामुळे आज होणारे समायोजन शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
डिमोशन झाल्यानंतर या शिक्षकांना आता दुसऱ्या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत असताना कुटुंबियांना सोडून आपल्याला कुठे जावे लागणार याची भितीही शिक्षकांना सतावत आहे. ज्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्या शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष झाले असून आपली बदली कुठे होणार, याच विवंचनेत ते आहे. विशेष म्हणजे, विषय शिक्षक म्हणून बीएसस्सी झालेल्या शिक्षकांनाही समायोजनासाठी बोलाविण्यात आले आहे. नियमित बिएड केलेल्या २६ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असतानाच आता पूर्वपरवानगी शिवाय बीएस्सी केलेल्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पूढे येत आहे. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षकाची नोकरी करीत असतानाच शासनाची परवानगी न घेता शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.
त्यामुळे त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना समायोजनामध्ये पदोन्नती न देता प्रथम त्यांच्या पदव्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Adjustment of promoted headmasters in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.