कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकरिता प्रशासनाच्या उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:41+5:302021-06-05T04:21:41+5:30
त्यामध्ये ‘गाव सुरक्षित तर मी सुरक्षित’ ही घोषणा देऊन गावस्तरीय समितीला त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या समजावून देण्यासाठी आणि त्यांच्या ...
त्यामध्ये ‘गाव सुरक्षित तर मी सुरक्षित’ ही घोषणा देऊन गावस्तरीय समितीला त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या समजावून देण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंडलनिहाय सर्व सरपंच, ग्रामसचिव, तलाठी, मंडल अधिकारी यांच्या संवाद सभा ६ जूनपर्यंत आयोजित केल्या आहेत. सदर सभेला तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, गटविकास अधिकारी वानखेडे व तालुका आरोग्य अधिकारी मुंजणकार उपस्थित राहणार आहेत.
त्याच्या वेळापत्रकानुसार बुधवारी माढळी व चिकनी येथे सभा पार पडल्या. त्यात मुख्यतः गाव सुरक्षित तर मी सुरक्षित ही घोषणा देऊन त्या अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना तहसीलतर्फे पुरस्कार देण्याचे घोषित करण्यात आले.
ग्रामस्तरीय समितीची रचना, कार्ये व जबाबदारी याबाबत त्यांना माहिती देऊन त्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर कशा करता येतील, याबाबतही चर्चा झाली.
===Photopath===
040621\img-20210604-wa0057.jpg
===Caption===
image