अल्पसंख्यक आयोगाच्या बैठकीसाठी प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:31 PM2018-12-15T22:31:13+5:302018-12-15T22:31:35+5:30

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

Administration preparations for the Minority Commission meeting | अल्पसंख्यक आयोगाच्या बैठकीसाठी प्रशासनाची तयारी

अल्पसंख्यक आयोगाच्या बैठकीसाठी प्रशासनाची तयारी

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : १५ कलमी कार्यक्रमांवर होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्यांक समुदायासाठी पंधरा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका यांना या संदर्भातील कार्यक्रम राबविणे अनिवार्य आहे. या सर्व कार्यक्रमांचा आढावा सोमवारी हाजी अराफत शेख घेणार आहेत. त्याअनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अल्पसंख्यांकांचे दायित्व असणाºया सर्व विभागाने आपला आढावा अध्यक्षांकडे सादर करावा, असे आवाहन केले. आजच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
विविध संघटनेशी साधणार संवाद
राज्य अल्पसंख्याक आयोगाच अध्यक्ष हाजी अरफात शेख सोमवारी सकाळी ८.१५ वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील विविध संघटनाशी संवाद साधणार आहेत. जैन समाज, सकाळी १०.३१ वाजता बौध्द समाज, त्यानंतर ख्रिचन, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, सेवायोजन अधिकारी यांच्याकडून योजनांची माहिती घेणार आहेत.

Web Title: Administration preparations for the Minority Commission meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.