प्रशासनाचे समाधान शिबिर शेतकरी हिताचे

By admin | Published: June 16, 2016 01:31 AM2016-06-16T01:31:01+5:302016-06-16T01:31:01+5:30

विविध दाखल्यांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी विविध दाखले कमी वेळात उपलब्ध झाले पाहिजे,

Administration solution for the benefit of the camp farmers | प्रशासनाचे समाधान शिबिर शेतकरी हिताचे

प्रशासनाचे समाधान शिबिर शेतकरी हिताचे

Next

विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन : नागरिकांना दाखल्यांचे वाटप
नवरगाव : विविध दाखल्यांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी विविध दाखले कमी वेळात उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी हे विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर विद्यार्थी व नागरिकांच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
नवरगाव येथे समाधान शिबिरात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. नवरगाव येथे तहसील कार्यालय सिंदेवाहीच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार भास्कर बांबोळे, सभापती रुपा सुरपाम, उपसभापती रमाकांत लोधे, उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये वनविभाग सिंदेवाही, शिवणी, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, एसटी महामंडळाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अर्जनविस, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. यावेळी लाभार्थ्यांना नुकसान भरपाई धनादेश वितरण, गॅस शेगडी वितरण, सायकल वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Administration solution for the benefit of the camp farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.