कोरोनात अनाथ झालेल्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:27+5:302021-09-06T04:31:27+5:30
कोरोनामुळे तालुक्यात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. परिणामी, अनेक मुले अनाथ झाली तर अनेक महिला विधवा झाल्या. या महिला व ...
कोरोनामुळे तालुक्यात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. परिणामी, अनेक मुले अनाथ झाली तर अनेक महिला विधवा झाल्या. या महिला व मुलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी नागभीड येथील तहसील कार्यालयात या लाभार्थ्यांची सभा घेतली. या सभेत योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यवाही करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांसाठी शासनाकडून कोणत्या योजना आहेत आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, यासंबंधीचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. एकूण ३२ लाभार्थी यावेळी उपस्थित होते. या सभेस गटविकास अधिकारी संजय पुरी, गट शिक्षणाधिकारी प्रमोद नाट, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे, सहायक संरक्षण अधिकारी नितीन वाघ तसेच घरकुल, समाजकल्याण, संजय गांधी निराधार योजना व इतर विभागाचे अधिकारीही या शिबिरास उपस्थित होते.