अवैध गौण खनिजप्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:13 PM2021-05-17T19:13:26+5:302021-05-17T19:14:22+5:30

Chandrapur : जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतुकीबर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचेमार्फत नियंत्रण ठेवण्यात येते.

Administration takes action against four vehicles in illegal minor mineral case | अवैध गौण खनिजप्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

अवैध गौण खनिजप्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

Next

चंद्रपूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता - 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये  दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतुकीबर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचेमार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू, रेती निर्गती सुधारीत धोरण, 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता उपविभागीय स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशीक परिवहनअधिकारी यांचा प्रतिनीधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेशअसलेली समिती गठीत केलेली आहे. 

तालुका स्तरावर तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख, गट विकासअधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार (महसूल) यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे.तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम सेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली गठीत केलेली आहे. जिल्हा भरारी पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथक बल्लारपूर दौऱ्यावर असतांना मौजा बामणी ता. बल्लारपूर येथील वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती,वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. 

सदर वाहनाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणारे रामु बंडी रा. बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर क्र. एम.एच.34 ए.पी - 2911, पप्पू घोडाम, रा. अमित नगर, बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 बी.एफ 9422, आरोफ शेख, रा.अमित नगर बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 एल - 9998, व महेंद्र डाखरे, रा.बल्लारपूर यांचे नंबर नसलेला एक वाहन ट्रॅक्टर असे एकूण 04 ट्रॅक्टर जप्त करून शंकर खरुले, तलाठी कळमना, तहसिल कार्यालय बल्लारपूर यांचेकडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Administration takes action against four vehicles in illegal minor mineral case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.