‘त्या’ 75 ग्रामपंचायतींवर आठवडाभरात प्रशासक राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 05:00 AM2021-07-16T05:00:00+5:302021-07-16T05:00:19+5:30

कोरोना परिस्थिती नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन  काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.   मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिपच्या ८५ आणि पंसच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. कोरोनामुळे  निवडणुका रद्द झाल्या आहेत.

Administrator Raj on 'those' 75 gram panchayats within a week | ‘त्या’ 75 ग्रामपंचायतींवर आठवडाभरात प्रशासक राज

‘त्या’ 75 ग्रामपंचायतींवर आठवडाभरात प्रशासक राज

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे राजकारण लॉक : निवडणुकीची शक्यताच मावळली

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक निवडणुका घेण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या  ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यापासून प्रशासक नियुक्तीचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी १२ जुलै २०२१ रोजी जारी केला. या निर्णयामुळे निवडणुका लढविण्यासाठी बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याची चर्चा आहे. 
कोरोना परिस्थिती नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन  काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.   मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिपच्या ८५ आणि पंसच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. कोरोनामुळे  निवडणुका रद्द झाल्या आहेत.

प्रशासकांना सरपंचाचे अधिकार 
प्रशासकपदी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीने इतरत्र पदस्थापना झाली असेल त्याठिकाणी त्यांच्या जागेवर बदलीने येणाऱ्यांनी प्रशासक म्हणून आपोआप नेमणूक झाल्याचे गृहीत धरण्यात येईल. 
रुजू झाल्यानंतर विनाविलंब तसा अहवाल जि.प.ला सादर करावा लागणार आहे. नियुक्त प्रशासकांना निवडणुका होईपर्यंत सरपंचाचे सर्व अधिकार लागू आहेत.

 तालुकानिहाय ७५ ग्रामपंचायती
- कोरपना : बेलगाव, बिबी, चनई, धानोली, दुर्गाडी, जेवरा, कन्हाळगाव, कातलाबोडी, खैरगाव, खिर्डी, कोठोडा बू. लखमापूर, मांडवा, मांगलहिरा, नांदा, पारडी, परसोडा, पिंपळगाव, पिपर्डा, रूपापेठ, सावलहिरा, सोनुर्ली, थुट्रा, उपरवाही, वडगाव, वनसडी 
- जिवती : आंबेझरी, आसापूर, केकेझरी, कोदेपूर, खडकी रायपूर, खडकी हि. गुडशेला, चिखली बू. चिखली खू. टेकामांडवा, दमपूरमौदा, धोंडा अ. नोकेवाडा, पाटण, पुनागुडा, भोक्सापूर, मरकलमेटा, मरकागोंदी, येल्लापूर, राहपल्ली, खू. शेनगाव 
- राजुरा : अहेरी, अंतरगाव, भेंडाळा, भेदोडा, भुरकुंडा बू. भुरकुंडा खू. ईसापूर, जामनी, कवाडगोंदी, कोष्टाळा, लक्कडकोट, मंगी बू. मानोली बू. मानोली खू. नोकारी खू. पाचगाव, पांढरपौनी, साखरी, साखरवाही, शिर्शी, सोनापूर, सोंडो, सोनुली, सुब्बई, टेंभुरवाही, वरूर रोड, येरगव्हाण,

राजुरा, जिवती व कोरपना तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत २१ ते २५ जुलै २०२१ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी झाला. नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेऊन तसा अहवाल पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे.
-कपिल कलोडे, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर

 

Web Title: Administrator Raj on 'those' 75 gram panchayats within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.