इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:40+5:302020-12-16T04:42:40+5:30
विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत ...
विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून प्राधान्यक्रमाने आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड केल्या जात होती. पूर्वी प्रथम पात्रता फेरीच्या राऊंड मध्ये आरक्षणानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी व एनटी विद्यार्थ्यांची जागा गुणानुक्रमाने भरल्या जायच्या व त्यानंतर आरक्षणाचा कोटा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत त्याच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे पात्र ठरलेल्याना प्रवेश द्यायचा. परंतु या नियमाला बगल देऊन पहिल्या पात्रता फेरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया तील कोटा शिल्लक राहिल्यास त्या जागा सरळ खुल्या प्रवर्गात टाकल्या जात आहे. या पद्धतीने मागासवर्गीयांचे आरक्षण पद्धतशीररीत्या सरकार संपवण्याचा घाट रचत आहे.ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अतिशय अन्यायकारक आहे.
वैद्यकीय प्रवेशात मात्र या नवीन नियमानुसार प्रवेश प्रक्रिया वापरत नसून जुन्या पद्धतीने पहिल्या पात्र फेरीत शिल्लक राहिलेला कोटा दुसऱ्या अथवा तिसऱ्या फेरीत पूर्ण करत आहे. आरक्षणाच्या निकषानुसार त्याच प्रवर्गातील विद्यार्थी ची निवड केली जात आहे किंवा त्या प्रवगातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ती जागा मागासवर्गीय कोट्यात वापरल्या जात आहे.
परंतु या नवीन पद्धती मध्ये सरकारने अभियांत्रिकी प्रवेश भरती बाबत मार्गदर्शन किंवा सूचना ठळक प्रसिद्ध किंवा जाहीर केल्या नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहे म्हणून शासनाने याबाबत खुलासा सादर करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा;अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.
कोट:-पहिल्या फेरीत मागास वर्गीय (अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी, एनटी) प्रवर्गातील कोट्यातील जागा शिल्लक राहण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा दुसऱ्या फेरीत शिल्लक जागा त्याच गटात किंवा उमेदवार उपलब्ध नसल्यास उर्वरित आरक्षणातील गटात कन्वर्ट करणे हिताचे आहे. याआधी अशीच प्रवेश प्रक्रिया राबविल्या जायची परंतु त्या खुल्या प्रवर्गात बदल करणे ही प्रक्रिया अतिशय धोकादायक असून आरक्षण संपण्याचा जणू घाटच आहे.
प्रा. नीरज नगराळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर.