आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:04+5:302021-08-27T04:31:04+5:30
पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर त्याबाबतचे प्रवेश निश्चितीकरणाचे शुल्क ...
पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर त्याबाबतचे प्रवेश निश्चितीकरणाचे शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्चित करावा व त्यानंतर उमेदवारांनी आयटीआय असलेल्या व्यवसायनिहाय विकल्प सादर करावे.
बाॅक्स
यासाठी मिळणार प्रवेश
बेकर ॲण्ड कन्फेक्शनरी, बेसिक कॉस्मेटालॉजी, कोपा, ड्रेस मेकिंग, वीजतंत्री, फ्रूट व्हेजिटेबल ॲण्ड प्रोसेसिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्लिश), सुईंग टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसाय उपलब्ध असून विविध व्यावसायाकरिता २०० जागा उपलब्ध आहे. प्रवेशाकरिता किमान १० वी पास तर काही व्यावसायाकरिता १० वी नापास उमेदवारांना सुद्धा प्रवेश दिला जाईल.
प्रवेश संबंधी तसेच अधिक माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.