शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:53 PM2020-07-27T15:53:53+5:302020-07-27T15:54:33+5:30

कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Admission of students under the name of Scholarship will not be canceled | शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत

शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे शैक्षणिक संस्थांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाकडून शिष्यवृत्ती अप्राप्त आहे. या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश मॅट्रिकेत्तर शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे, असेही त्यांनी नमुद केले. या निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मार्च २०२० पासून जगासह राज्यात कोविड १९ या विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील उद्योगधंदे तसेच राज्याच्या महसुलात भर टाकणारे उत्पनाचे स्रोत ठप्प झाल्यामुळे राज्याच्या महसुलात कमालीची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करणे शासनाला शक्य झाले नाही. असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांची अनुज्ञेय शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्याच्या सबबीखाली काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला देण्याचे नाकारत आहे. ही बाब निदर्शनास येताच वडेट्टीवार यांनी तातडीने इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत या संदर्भात शासन निर्णयच जाहीर केला आहे.

Web Title: Admission of students under the name of Scholarship will not be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.