राजुऱ्याच्या तालुका क्रीडांगणाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:47 PM2019-05-20T22:47:35+5:302019-05-20T22:48:04+5:30

मागील आठ वर्षांपासून राजुरा येथील क्रीडांगणाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास गेले नाही. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीच या क्रीडांगणामधील मोटारपंप चोरीला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने मीटर काढून नेले आहे. येथील साहित्य व इमारत बकाल झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे क्रीडांगणाचे काम अपूर्ण असल्याचा केला जात आहे.

Adoor's taluka playground drought | राजुऱ्याच्या तालुका क्रीडांगणाची दुरवस्था

राजुऱ्याच्या तालुका क्रीडांगणाची दुरवस्था

Next
ठळक मुद्देक्रीडा प्रेमींकडून नाराजी : उद्घाटनापूर्वीच मोटारपंप गेला चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मागील आठ वर्षांपासून राजुरा येथील क्रीडांगणाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास गेले नाही. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीच या क्रीडांगणामधील मोटारपंप चोरीला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने मीटर काढून नेले आहे. येथील साहित्य व इमारत बकाल झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे क्रीडांगणाचे काम अपूर्ण असल्याचा केला जात आहे.
तालुकास्तरावर अद्यावत क्रीडांगण असावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी बांधकाम व विविध साहित्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. राजुरा येथील क्रीडांगण जवळपास पाच एकर जागेवर तयार करणे सुरु केले. २०११ मध्ये क्रीडांगणाचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र तब्बल आठ वर्षे लोटूनही क्रीडांगणाचे काम पूर्णत्वास गेले नाही. येथील अनेक साहित्य भंगार अवस्थेत आहेत. इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. खीडक्यांची तावदाने तुटलेली आहे. बास्केटबॉल कोर्ट पूर्ण झालेला नाही, हॉलीबॉल ग्राऊंडचा पत्ताच नाही, दोनशे मीटर ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. या परिसरात तालुका क्रीडांगणाचे कार्यालय नाही, स्थायी स्वरूपात कुठलेही प्रशिक्षक नाही, देखरेखीसाठी सुरक्षारक्षक नाही, त्यामुळे सदैव कुलुपबंद असलेल्या क्रीडांगणाकडे क्रीडा प्रेमींनी पाठ फिरविली आहे. एवढ्या मोठ्या जागेत प्रशस्त तालुका क्रीडांगण असताना सुद्धा स्थानिक विद्यार्थी व क्रीडाप्रेमी सदैव उपेक्षितच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोट्यवधीचा खर्च वाया गेला आहे. याबाबत मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गंभीर नसून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे, क्रीडांगणाच्या उद्घाटनापूर्वी इमारतीची अवस्था बकाल झाली असून बांधकामही निकृष्ट दर्जाचे आहे. येथील स्वच्छतागृह संपूर्णत: खराब झाले आहे. स्वच्छतागृहाला दरवाजे नसून पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. या इमारतीत बॅडमिंटन कोर्ट करण्याचे प्रस्तावित होते. मात्र येथील सभागृहाची अवस्था दयनिय झाल्याने बॅडमिंटन कोर्टसाठी पुढच्या हॉलमध्ये लोखंडी खांब टाकण्यात आले आहेत. संपूर्ण इमारतीचे काचेची तावदाने फुटली आहे. या क्रीडांगणाला लागूनच व्यायामासाठी ग्रीन जिमसाठी लाखोंचे क्रीडा साहित्य बसवण्यात आले आहेत. मात्र सदैव बंद असल्यामुळे हे सर्व साहित्य धुळखात पडले आहे. दरवर्षी तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजन केल्या जाते, मात्र मैदान तसेच सुविधांअभावी या स्पर्धा खाजगी शाळांतील मैदानावर भरविल्या जात असून आयोजनावर लाखोंचा खर्च केल्या जात आहे.
सुरक्षेचा अभाव
येथे पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मोटारपंप लावण्यात आला. मात्र तोही चोरट्यांनी लंपास केला आहे. येथील अन्य साहित्यही सुरक्षित नाही. त्यामुळे किमान येथे साहित्याच्या सुरक्षेकरीता सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.
स्पर्धांच्या चौकशीची मागणी
दरवर्षी विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. यात हॉलीबॉल व इतर सामने आयोजित केले जातात. मात्र येथील अधिकारी व आयोजकांच्या संगनमतातून या निधीची परस्पर वाट लावली जात असल्याचा आरोप आहे. तालुका क्रीडांगणात व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन यावर्षी करण्यात आल्याचे समजते. मात्र या क्रीडांगणावर साधे हॉलीबॉल खांब सुद्धा अस्तित्वात नाही. यामुळे या स्पर्धा आयोजनांवर होणारा खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
इमारतीत अंधार
इमारतीच्या उद्घाटनापूर्वी येथील वीज मीटर बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने काढले आहे. त्यामुळे सध्या येथील इमारतीमध्ये सर्वत्र अंधार आहे.

Web Title: Adoor's taluka playground drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.