आदिवासींच्या योजनांची योग्य अमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:52 PM2018-04-09T23:52:03+5:302018-04-09T23:52:03+5:30
आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.
वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले असता आदिवासी बांधवानी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागण्यांच्या निवेदन दिले. दरम्यान या समस्या अल्पवधीत सोडविल्या नाही तर राज्यभरातील विविध आदिवासी संघटना वरोरा येथे तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशाराही आदिवासी समाज संघटनेचे वरोरा-भद्रावती विभागाचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी निवेदनातून दिला.
वरोरा येथे एटीएममधून रक्कम चोरी झालेल्या प्रकरणात सुरक्षारक्षक भूमेश्वर येलके यांनी पोलिसांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या परिवारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन सदर प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात यावी, शुभांगी उईके मृत्यू प्रकरणात तेथील पोलीस अधिकारी हयगय करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेत अधिकाºयांकडून गरजू आदिवासींना डावलल्या जाते. त्यामुळे या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचे निवेदन ना. विष्णू सावरा यांना देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. सावरा यांनी या मागण्यांचा विचार करुन आपण पाठपुरावा करु, असे आवाहन शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात रमेश मेश्राम, विलास परचाके, प्रा. उमेश मेश्राम, सुरेश मडावी, हरी कुळसंगे, महादेव सिडाम, शेडमाके, नागोजी सिडाम उपस्थित होते.