‘त्या’ बालिकेला कार्यकर्त्याने घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:26 AM2018-09-21T00:26:44+5:302018-09-21T00:29:53+5:30

सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे बादल बेले यांनी सास्ती येथील अंगणवाडी क्र. २ मधील कुपोषित बालिका तेजल संतोष सिडाम हिला दत्तक घेतले.

'That' adopted by a party worker for adoption | ‘त्या’ बालिकेला कार्यकर्त्याने घेतले दत्तक

‘त्या’ बालिकेला कार्यकर्त्याने घेतले दत्तक

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कुपोषित बालिकेला पोषण आहाराची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे बादल बेले यांनी सास्ती येथील अंगणवाडी क्र. २ मधील कुपोषित बालिका तेजल संतोष सिडाम हिला दत्तक घेतले.
राजुरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमीन महाजनवार यांच्या संकल्पनेतून ‘बाळूू’ युनिट अंतर्गत वाढदिवसाच्या दिवशी तालुक्यातील कुपोषित बालकास दत्तक घेवून त्यांना पोषण आहार पुरवठा करणे व त्याचे पालकत्व स्वीकारणे असा उपक्रम सुरू करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, सास्ती ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पेटकर, भाजपा जिल्हा सचिव मधुकर नरड, ग्रामपंचायत सदस्य क्रिष्णा अवतार संबोज, मादर नरसिंग, राजकुमार भोगा, ग्रामविस्तार अधिकारी व्ही. पी. तितरे, प्रशांत घरोटे, सचिन डोहे, सचिन शेंडे, रूपेश चिडे, बंडू बोढे, विहीरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच इरशाद शेख, भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मोहन कलेगूरवार, सुधीर आरकेलवार, अमित जयपूरकर, सुभाष बोनगीरवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया नवखेडे, अंगणवाडी सेविका इंदिरा माथनकर, मंदा बेले, गिता चन्ने, सिडाम, रूक्साना पठाण आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता अभियानाची शपथ घेण्यात आली. ‘बाळू’ उपक्रमात कुपोषित बालकास पोषण आहार देऊन त्यांना सुदृढ केले जाते.
राजुरा पंचायत समिती अंतर्गत वाढदिवसाच्या दिवशी हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, ग्रामपंचायत सदस्य मादर नरसिंग, पर्यवेक्षिका छाया नवखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने सामाजिक दृष्टिकोन ठेवून गरजु मुलांना दत्तक घेण्याचे यावेळी सांगणयात आले. विहिरगावचे उपसरपंच इरशाद शेख यांनी संचालन केले.

Web Title: 'That' adopted by a party worker for adoption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.