अध्यक्षपदी ॲड.पाचपोर तर सचिवसाठी आशिष धर्मपुरीवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:43+5:302021-09-24T04:32:43+5:30
बल्लारपूर : जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूरच्या द्विवार्षिक निवडणुकीत ॲड.अभय पाचपोर हे अध्यक्षपदासाठी तर सचिवपदासाठी आशिष धर्मपुरीवार यांनी दणदणीत विजय ...
बल्लारपूर : जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूरच्या द्विवार्षिक निवडणुकीत ॲड.अभय पाचपोर हे अध्यक्षपदासाठी तर सचिवपदासाठी आशिष धर्मपुरीवार यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
बुधवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रात्री १०.३० वाजेपर्यंत चालली. या मतमोजणीत ॲड. अभय पाचपोर हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते व शेवटी ते १४६ मतांनी विजयी झाले. उपाध्यक्ष ॲड.राजेश ठाकूर हे २३९ मतांनी विजयी झाले. सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार हे १४९ मतांनी, सहसचिव ॲड.विनायक कार्लेकर यांना १४६ मते मिळाली. कोषाध्यक्ष ॲड.राजेंद्र झुलकंठीवार यांना ९५ व ग्रंथपालपदासाठी केनाला सरोजकर यांचा ६६ मतांनी विजय झाला.
बॉक्स
विजयी कार्यकारी सदस्य
कार्यकारी सदस्यांमध्ये पुरुषामधून वकील राहुल मेंढे, आशिष मुंधडा, अविन डोलकर, कृष्णकांत रासपेल्ली, नंदकिशोर राऊत, प्रफुल्ल मुरकुटे, उमेश मोहुर्ले, राशिद शेख, विनोद मोटघरे, तसेच महिला वकिलांमधून मंजू लेडांगे, स्नेहा खिरटकर, स्नेहा गिरी यांचा दणदणीत विजय झाला.या निवडणुकीत जिल्हा बार असोसिएशनच्या न्यायालयीन चेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ६१८ वकिलांपैकी ५६३ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावून एका हाती निर्विवाद बहुमत दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बळवंतराव टिकले यांनी काम पाहिले.