पोस्ट कोविड रूग्णांना आरोग्य केंद्रातून सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:36+5:302020-12-26T04:23:36+5:30
रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. हृदयरोग, डायबिटीस, रक्तदाब असणा-या ...
रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. हृदयरोग, डायबिटीस, रक्तदाब असणा-या व्यक्तींना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेने शहरातील प्रत्येक आरोग्य केंद्राशी जोडण्यात आले. आरोग्य कर्मचारी अशा पोस्ट काेविड रूग्णांची ऑक्सिजन पातळी तपासतात. मानिसक आरोग्याबाबत काही अडचणी असल्यास समुपदेशन करतात. अशा रूग्णांची मनपाने माहिती नोंदवून ठेवली आहे. पोस्ट कोविड रूग्णांनी डाॅक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आहार-विहाराबाबत चुकीचे निर्णय घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
घाबरण्याचे कारण नाही
पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी १४ ते १७ दिवसांचा कालावधी लागतो. डिस्चार्ज दिल्यानंतर समस्या उद्भवल्यास तातडीने उपचार केले जाते. त्यासाठी मनपाने आरोग्य केंद्रांमध्ये तशी व्यवस्था केल्याने घाबरण्याचे कारण नाही.
- आविष्कार खंडारे
वैद्यकीय अधिकारी, मनपा, चंद्रपूर