कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By admin | Published: June 24, 2017 12:37 AM2017-06-24T00:37:46+5:302017-06-24T00:37:46+5:30
पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी अधिकारी व पंचायत कृषी विभागाची बैठक घेऊन जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यानी गुरूवारी आढावा घेतला.
गावांना भेटी द्या : पंचायत समिती उपसभापतींनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी अधिकारी व पंचायत कृषी विभागाची बैठक घेऊन जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यानी गुरूवारी आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या.
तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी.वेळोवेळी कृषी अधिकारी व सहायकाचे मार्गदर्शन मिळावे, या याकरिता देवकते यांनी ही बैठक घेतली.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी शेख, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी सहाय्यक माधव राठोड, नामदेव राठोड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बबन वारे, राजेश राठोड, तुकाराम वारलवाड, गोविंद टोकरे,नारायण वाघमारे, गणेश जाधव, शामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, शरद चव्हाण, माधव पांचाळ उपस्थित होते
गेल्या पाच वर्षांच्या काळात कृषी विभागाची आढावा बैठक झाली नसल्याने शेतकऱ्यांना शासन योजनेची माहिती मिळत नव्हती.
पिकावर लागवाडी बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे ही बैठक तातडीने बोलावून पंचायत समितीचे उपसभापती देवकते यांनी कृषी अधिकारी व कृषी सहायकांची कानउघाडणी केली. आठवड्यातून एकदा आपल्या परीसरातील गावात भेटी द्या, प्रत्येक ग्रामपंचायतीला कृषी अधिकारी व कृषी सहायकाचे संपर्क फलक लावण्याच्या सूचना केल्या.