वकिलांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:22 PM2018-01-30T23:22:46+5:302018-01-30T23:23:28+5:30
महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारीला नवीन अध्यादेश जारी करुन कोर्ट फीमध्ये वाढ केली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारीला नवीन अध्यादेश जारी करुन कोर्ट फीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ अयोग्य व अन्यायकारक असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ सोमवारी न्यायालयीन काम बंद आंदोलन केले. तसेच वाढीव फी मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
न्यायव्यवस्था समाजाच्या हितार्थ असून सर्व सामान्य नगारिकांकरिता सेवा म्हणून आहे. मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार कोर्ट फी वाढविल्याने सामान्य जनतेला पाच पट अनावश्यक भुर्दंड बसणार आहे. या माध्यमातून सरकारचा खजिना भरण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फी वाढीचा निषेध करण्यासाठी जिल्हा न्यायालय चंद्रपूर समोर वकील संघटनेचे ३०० ते ४०० सदस्य एकत्र येवून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रमेश टिपले, अॅड. गिरीश मार्लीवार, सचिन अॅड. टंडन, अॅड. लोहे, अॅड.मुकूंद टंडन, अॅड. सपाटे, अॅड. दत्ता हजारे, अॅड. बापट, अॅड. फरहान बेग, अॅड. बजाज, अॅड. धागमवार, अॅड. चैताली बोरकुटे, अॅड. वैशाली टोंगे आदी उपस्थित होते.