येरगव्हाण ग्रामपंचायत तर्फे आरो प्लांटची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:40+5:302021-07-07T04:34:40+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय येरगव्हाण तर्फे आरो प्लांटचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ...
देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय येरगव्हाण तर्फे आरो प्लांटचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सभापती मुमताज जावेद अब्दुल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच मानकू आत्राम, पेसा ग्रामकोष अध्यक्ष बेबीबाई जंबोड, ग्रा. पं. सदस्य शशिकला डोहे, भीमराव कुळसंगे, सुनीता कोतापल्ली, देवाडा उपसरपंच अब्दुल जावेद, ग्रामसेवक विलास धारणे, ग्रा.पं. कर्मचारी, समस्त गावकरी उपस्थित होते. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, याकरिता आदिवासी पेसा निधी योजने अंतर्गत ५ लाख ८९ हजार रुपयांची आरो प्लांट तयार करण्यात आला. अशुद्ध पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात, याची दखल घेऊन नागरिकांच्या सुविधाकरिता आरो प्लांट उभारण्यात आले.