कोविड अनाथांशी आपुलकीचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:54+5:302021-08-01T04:25:54+5:30
चिमूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ...
चिमूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादी जिवलग’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात शनिवारी चिमूर येथून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत कोरोना महामारीत माता-पित्याचे छत्र हरपलेल्या मुलांच्या संगोपनात साहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी सेवादूत शासन, प्रशासन व संबंधित मुलांच्या कुटुंबीयांसोबत कार्य करणार आहे.
चिमूर येथील श्रुष्टी गणपत खोबरे हिला खासदार सुप्रिया सुळे यांचे आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व तसेच विश्वास देणारे पत्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद पठाण, शहर अध्यक्ष मंगेश बारापात्रे, युवक शहर अध्यक्ष रामदास ठुसे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव लडी, शिक्षिका दुर्गा रामगुंडे, गुडू मोदी, अमोल कामडी आदी उपस्थित होते. आई-वडील गमावल्याचे दुःख कधीही न भरून येणारे असते, असे प्रतिपादन ॲड. मेघा रामगुंडे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.