२० तासानंतर त्या युवकाचा मृतदेह कुटुंबीयांनी घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:44+5:302021-05-17T04:26:44+5:30

मृताच्या शरीरावर गंभीर जखमी होत्या. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. वरोरा शहरातील पंचायत समिती ...

After 20 hours, the body of the youth was taken into custody by his family | २० तासानंतर त्या युवकाचा मृतदेह कुटुंबीयांनी घेतला ताब्यात

२० तासानंतर त्या युवकाचा मृतदेह कुटुंबीयांनी घेतला ताब्यात

Next

मृताच्या शरीरावर गंभीर जखमी होत्या. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

वरोरा शहरातील पंचायत समिती कार्यालयनजीक अंबादेवी वाॅर्ड रोडलगत एका टिनाच्या शेडमध्ये १५ मे रोजी आबिद शेख हे आपल्या काही सहकाऱ्यांसह सायंकाळी बसला असताना दोन ते तीन युवक तोंडाला रुमाल बांधून दुचाकी वाहनाने घटनास्थळी आले. आबिद शेख याच्यावर हल्ला करून निघून गेले. घटनेची माहिती वरोरा पोलिसांना मिळताच जखमीला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीय व आप्तेष्टांना मिळताच उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

बॉक्स

घटनास्थळावरून एक पिस्तूल, चाकू व दुचाकी वाहन जप्त

घटनास्थळावरून एक पिस्तूल, चाकू व दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. मृताच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मारेकऱ्यांचा शोध घेण्याकरिता एलसीबी चंद्रपूरचे तीन पथक, वरोरा भद्रावतीचे प्रत्येकी एक पथक व सायबर सेलचे एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी सापडलेली पिस्तूल व चाकू तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

Web Title: After 20 hours, the body of the youth was taken into custody by his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.