५० दिवसानंतरही बँकेसमोर रात्री रांगाच रांगा

By admin | Published: January 16, 2017 12:41 AM2017-01-16T00:41:51+5:302017-01-16T00:41:51+5:30

केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरला १००० व ५०० रुपयांचे नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.

After 50 days, the front row rails of the bank | ५० दिवसानंतरही बँकेसमोर रात्री रांगाच रांगा

५० दिवसानंतरही बँकेसमोर रात्री रांगाच रांगा

Next

संपूर्ण रात्र जागून काढली : शेकोटी पेटवून रात्री १२ वाजतापासून रांग
फारूख शेख पाटण
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरला १००० व ५०० रुपयांचे नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. दिलेल्या आश्वासनानंतरही बँकेसमोरील रांगा कमी झालेल्या नाहीत.
जिल्ह्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त जिवती तालुक्यात आजही बँकेसमोर रांगा दिसतच आहे. तालुक्यात एकमात्र भारतीय स्टेट बँक आहे. ही बँक रविवारलाही सुरू राहते. शेतकऱ्यांनी शनिवारी रात्री १२ वाजतापासूनच शेकोटी पेटवून बँकेसमोर रात्रभर रांग लावली. त्यातील पुडियालमोहदा येथील शेतकरी संदीप कागते ४२ कि.मी. वरून वाहनावर शिदोरी घेवून पाटण येथील बँकेत आले. मी शनिवारलाच आलो होतो. परंतु माझा नंबर लागला नसल्याने मी पैशासाठी बँकेसमोर मुक्काम केला आहे, असे त्यांनी सांगितले. तर कुंभेझरी येथील व्यंकटी नागनाथ ठोबरे, प्रल्हाद कोंडिबा ठोंबरे, सुनील रामलिंग तांबुळे ४० किमी अंतरावरून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतातील कामे आटोपून सर्व जण बँकेसमोर रात्रीला मुक्कामाने आले. सावकाराच्या व इतर घरगुती कामाकरिता पैशाची आवश्यकता असल्याने आणि बँकेतील काम लवकर करून पुन्हा शेतात जाता यावे, यासाठी त्यांनी रात्रीलाच मुक्कामाने आले होते.
४० कि.मी. अंतरावरील हेंडवा येथील लखन ग्यानबा डोडबे, रूपेश गोपाळ पांढरे यांनी सांगितले की, आमच्याकडे एटीएम कार्ड आहे. परंतु त्यातून दोन हजार रुपये मिळत असल्याने सावकार, कृषी सेवा केंद्र आणि दवाखान्यात पैसे द्यायचे असल्याने आम्ही रात्रीच मुक्कामने आलो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.

तालुक्यातील शेतकरी व पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. आम्ही शनिवारी ८० लाख रुपयांची मागणी जिल्हा शाखा बँकेकडे केली. परंतु त्यांनी ३० लाख रुपये दिले असल्याने आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना २४ हजार रुपयांऐवजी १४ हजार रुपये दिले आहे.
- वाटकर, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, शाखा पाटण

Web Title: After 50 days, the front row rails of the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.