आंदोलनानंतर कोल वाॅशरीमध्ये ट्रकमालकांना मिळणार नियमित काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:38+5:302021-07-10T04:20:38+5:30
घुग्घुस : महामीनरल मायनिंग ॲन्ड बेनिफिकेशन प्रा. लि. गुप्ता वॉशरीज उसगाव कोलवाशरीमध्ये स्थानिक ट्रकमालकांना सरळ कोळसा वाहतुकीचे काम देण्यात ...
घुग्घुस : महामीनरल मायनिंग ॲन्ड बेनिफिकेशन प्रा. लि. गुप्ता वॉशरीज उसगाव कोलवाशरीमध्ये स्थानिक ट्रकमालकांना सरळ कोळसा वाहतुकीचे काम देण्यात यावे, यासाठी काल घुग्घुस शहर कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल ठाणेदारांनी घेऊन आंदोलनकर्ते, वॉशरी व्यवस्थापनाची संयुक्त बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली. त्यात ट्रकमालक-चालकांना नियमित काम देण्याचे मान्य केले.
शुक्रवारी दुपारी पोलीस स्टेशनमध्ये संयुक्त बैठकीचे घेण्यात आली. त्यात ठाणेदार राहुल गांगुर्डे, वॉशरीज व्यवस्थापक शशी गुप्ता, सुयोग बिडलावार, संजय सरागे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजु रेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर चालक-मालक संघटनेचे श्रीनिवास गोस्कुला, राकेश खोब्रागडे, रियाज खान उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत स्थानिक चालक-मालक यांना कोळसा वाहतुकीचे नियमित कामे देण्याची मागणी वॉशरीज व्यवस्थापकांनी मान्य केली.