अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:23 PM2018-04-04T23:23:01+5:302018-04-04T23:23:01+5:30

लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.

After all, the construction of the 'house' started | अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देघरकूल चोरी प्रकरण : बांधकाम न करताच बांधल्याची केली होती नोंद

फारूख शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.
जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत एक लाख रुपये किंमतीचे घरकूल सन २०१३-१४ या वर्षांत मंजूर झाले. तत्कालीन ग्रामसेवकांनी या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घर पाडून घरकूल योजनेचे घर बांधण्यास सुरूवात केली व बँकेचे खातेही उघडले. त्यानंतर एका महिन्यानी जिवती पंचायत समितीमध्ये पहिला बिल घेण्यासाठी गेले असता लाभार्थ्यांना धक्काच बसला.
शासन दरबारी आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाले, अशी नोंद असल्याने त्यांना घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कच्चे घर पाडल्याने लाभार्थ्यांना परिवारासह उघड्यावरच जीवन जगावे लागत होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने २४ जानेवारीला ‘लाभार्थ्यांचे घरकूल गायब’ असे वृत्त प्रकाशित केले. तेव्हा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले.
तालुका संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी यांनी त्या लाभार्थ्यांची भेट घेतली. तुम्हाला लवकरच घरकुलाची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार या लाभार्थ्यांना पैसे मिळाले असून घरकूल बांधकामाला लाभार्थ्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

आम्हाला सन २०१३-१४ या वर्षात घरकूल मंजूर झाले. त्यानंतर ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून आम्ही कुळाचे घर पाडून घरातील पाळीव शेळ्या विकून जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर पंचायत समितीत घरकूलाचा पहिला बिल मिळवण्यासाठी गेलो असता, आमचे घरकूल पूर्ण झाल्याची नोंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून कुटुंबासह उघड्यावर जीवन जगत होतो. अनेकदा पंचायत समितीत पत्रव्यवहार केला. पण आमचे कोणीच ऐकत नव्हते. लोकमतने आमची व्यथा मांडताच आज आमचे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत.
- गुडेराव आत्राम, विठ्ठल लटारी नैताम,
लाभार्थी, जनकापूर.

Web Title: After all, the construction of the 'house' started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.