आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:28+5:302021-08-23T04:30:28+5:30

टॉवर लाईन कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन ब्रम्हपुरी : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील ...

After the assurance, the farmers went on a hunger strike; | आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे;

आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे;

Next

टॉवर लाईन कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

ब्रम्हपुरी : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील पिंपळगाव, अऱ्हेर नवरगाव, नांदगाव, नाहोरी कलेता, तोरगाव, मौशी आदी गावांतील टॉवरग्रस्त शेतकरी टॉवर लाईनचा मोबदला न मिळाल्याने उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले होते. अखेर दोन दिवसांनी कंपनीच्या प्रतिनिधींनी, एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले.

ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील शेतशिवारातून रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची ७६५ के.व्ही. उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली आहे. २०१६ ला या कामाला सुरुवात करण्यात आली व ते काम पूर्णसुद्धा झाले, मात्र शासकीय आदेशानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मोबदला द्यायचे ठरले होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनसुद्धा कंपनीने मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर व राजकीय नेत्यांना निवेदने देऊन भरपाई मोबदला मिळवून देण्यासाठी विनंती केली होती. तरीही याकडे कंपनीने लक्ष दिले नाही. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोरील मैदानावर साखळी उपोषणाला बसले होते. आंदोलनाची दखल घेत अखेर दोन दिवसांनी रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्याची लेखी हमी व तोंडी आश्वासन दिल्याने, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अखेर त्यांनी उपोषण मागे घेतले.

Web Title: After the assurance, the farmers went on a hunger strike;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.