आश्वासनानंतर रेल्वे कॅन्टीन कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:52 PM2019-03-04T22:52:28+5:302019-03-04T22:52:45+5:30
बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन, रेल्वेने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीकरिता कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. ते उपोषण आज नऊ दिवसानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन, रेल्वेने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीकरिता कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. ते उपोषण आज नऊ दिवसानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
आदर्श मीडिया असोसिएशन यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात अंतय्या वाकटी, चंद्रशेखर तुरकर हे उपोषणाला बसले होते. सोमवारी पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, मध्य रेल्वे नागपूर डीआरयुसीसीचे सदस्य अजय दुबे, मध्य रेल्वे नागपूरचे डीपीओ मो. काझी, बल्लारपूर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामकिशोर निपसय्या, जयकरण सिंह बजगोती, आदर्श मीडिया असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया झामरे, संतोष शेडमाके, अनुला सरकार, संगिता वनकर, विजय मुके, सुभाष सिडाम, किशोर सहारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट दिली. एका आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले व आश्वासनानंतर उपोषण समाप्त करण्यात आले.